फायनान्सियल प्लानिंग आणि त्याचे महत्व
नमस्कार मित्रांनो.
फायनान्सियल प्लानिंग म्हणजे आर्थिक नियोजन : आपल्या उत्पन्न खर्च बचत आणि गुंतवणूक याची आखणी करून शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म साठी नियोजन करणे
यामध्ये बजेट तयार करणे,saving , investment,risk management, retirement planning आणि टॅक्स प्लॅनिंग हे सगळे भाग येतात
फायनान्सियल प्लानिंग आपल्याला आजचे आर्थिक निर्णय आणि भविष्यातील सुरक्षितता यासाठी मदत करते
यामध्ये पैसे कसे कमवायचे,किती खर्च करायचे आणि किती बचत ,कुठे गुंतवणूक करायची याचा विचार केला जातो.
आर्थिक प्लॅनिंग चे महत्व:
प्लानिंग केल्याने आपली उद्दिष्टे स्पष्ट होतात जसे की,नवीन घर खरेदी करणे ,मुलांचे उच्च शिक्षण, लग्न , रिटायरमेंट fund तयार करणे
अचानक उद्भवणारे खर्च जसे की आजारपण,जॉब जाणे, यासाठी emergency fund तयार करता येतो
बचत आणि गुंतवणुकीची सवय लागते : नियमित sip, insurance, FD,gold , real estate घेतल्याने आर्थिक शिस्त लागते
कर्जाचा भार कमी होऊ शकतो: योग्य आर्थिक नियोजन केल्यास लोन घेणे व त्याची परतफेड करणे यावर नियोजन करता येते
Tax saving होते: योग्य रीतीने tax प्लानिंग करता येते
भविष्य सुरक्षित होते: योग्य प्लानिंग केल्याने भविष्या तील खर्चासाठी वेगळी तरतूद करता येते आणि निवृत्ती नंतरचे जीवन सुसह्य करता येते
आर्थिक ताण कमी होतो : पैशाचे योग्य नियोजन केल्याने मानसिक ताण कमी होतो व समाधान मिळते.
संपत्ती तयार करता येते: आपली कष्टाने कमावलेले पैसे निष्कीय न ठेवता गुंतवणूक केल्याने संपत्ती तयार करता येते
अशा प्रकारे आपले financial planning केले तर आर्थिक सुरक्षितता व यशाकडे जाणारा रस्ता तयार होतो म्हणून प्रत्येकाने आपले financial planning केलच पाहिजे
धन्यवाद
Comments
Post a Comment