पैसा म्हणजे काय ?
मित्रानो
पैसा म्हणजे काय .?
तर पैसा म्हणजे अशी गोष्ट जी सर्वमान्य आहे . पूर्वी एखादि गोष्ट घ्यायची म्हणजे वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली जायची .त्यामध्ये एक अडचण होती .समजा माझ्याकडे धान्य आहे आणि मला कपडे हवे असतील तर धान्याची किंमत आणि कपड्याची किंमत यामध्ये सारखेपणा नव्हता .म्हणजेच कधी कपडे धान्यापेक्षा महाग तर कधी स्वस्त .यामुळे वस्तू विनिमय दर सारखा नव्हता . आणि गोंधळ होत असे.
त्यामुळे नंतर एक परिणाम ठरवण्यात आले .ज्यामध्ये प्रत्येक वस्तूची एक किंमत ठरवण्यात आली .आणि वस्तू साठी पैशांमध्ये देवाण देवाण होऊ लागली .
सुरवातीच्या काळात पैसा हा सोने चांदी आणि तांबे हे मौल्यवान धातू वापरून नाणी तयार करण्यात येत असत पण सोने आणि चांदी या धातूच्या किंमतीत मोठी वाढ होऊ लागली . परिणामी धातूची मागणी वाढू लागली .पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तीव्र धातू टंचाई निर्माण झाली .
अशा परिस्थितीत अमेरिकन सरकारने असे जाहीर केले की अमेरिकी डॉलर हा जागतिक स्तरावर मान्य चलन असेल .ज्याच्याकडे जास्तीत जास्त अमेरिकन चलन असेल त्याला अमेरिका डॉलर च्या बदल्यांमध्ये सोने आणि चांदी देईल .या व्यवस्थेचा काही देशांनी लाभ घेतला आणि अमेरिकन अर्थव्यवस्था संकटात आली.
15 ऑगस्ट 1971 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांनी जाहीर केले की,इथून पुढे अमेरिका असे काही करणार नाही .डॉलरला अमेरिकन सरकारने हमी दिली होती ती नाकारली.पण डॉलर जागतिक अर्थ व्यवस्थेत टिकून राहिला.इथून पुढे fiat money ही संकल्पना उदयास आली.
आता जो आपण पैसा वापरत आहोत हा fiat money आहे.याला कोणताही आधार नाही.जो पर्यंत सरकार या पैशाला हमी देत आहे तोपर्यंतच हा पैसा अर्थव्यवस्थे मध्ये मध्ये मान्य असतो. आपण सर्वांनी भारत सरकारने केलेले demonitation (2018) माहिती आहेच.
तर मित्रांनो पैसा म्हणजे एक विनिमयाचे सर्वमान्य साधन असते .
त्याचा इतिहास आज आपण पाहिला .आपण इथून पुढे पैशाविषयी समज आणि गैर समज समाजात काय आहेत हे पाहूया
Comments
Post a Comment